Devendra Fadanvis said that world-class artificial organs are available in India : समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे
Pune : आपल्या देशात पूर्वी कृत्रीम अवयव आयात करावे लागत होते. पण आर्टिफिशियल लिम्ब्ज मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेन ऑप इंडिया स्थापन केल्यामुळे जागतिक गुणवत्तेचे कृत्रिम अवयव आता आपल्या देशातच तयार होत आहेत. ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने योजना सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आणि भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे यंच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळा भांडारकर संस्थेमध्ये (पुणे) नुकताच पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, केंद्राचे विश्वस्त व प्रमुख विनय खटावकर, सचिव राजेंद्र जोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.
CM Devendra Fadnavis: अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम होणार
ज्याच्याकडे शक्ती आहे, तो जगेल असे पाश्चिमात्य संस्कृती सांगते. पण जो जन्माला आला आहे, तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे भारतीय संस्कृती सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने नियोजनबद्ध व्यवस्था करून आणि सेवा आणि समर्पण भाव ठेऊन दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा जागतिक विक्रम केला. हा विक्रम पुन्हा हीच संस्था मोडेल, असेही ते म्हणाले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परीक्षक स्वप्नील डांगरेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी जागतिक विक्रमाबाबत माहितीची चित्रफित दाखविण्यात आली. प्रायोजक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.