Shiv Sena chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray met on birthday a matter of joy : वाढदिवसानिमित्त उद्धव-राज ठाकरे भेटले ही आनंदाची बाब
Nagpur : महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी पाहिलेच. पण आताही महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दिसणार आहे. पण काही राजकीय पक्षांच्या लोकांच्या मनात जे आहे, तेच महाराष्ट्राच्या मनात आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्था आमच्याच’, असा संदेश दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात विचारले असता, ही आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांना घरी जाऊन भेटले, यामध्ये राजकीय बाब शोधण्यासारखे काहीच नाही. यामध्ये राजकारण शोधण्याचे काहीही कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे येथे रेव्ह पार्टी झाली. पण ही माहिती मला माध्यमांतून मिळाली. कारण काल मी दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे मला मूळ ब्रिफींग घेता आले नाही. मात्र माध्यमांच्या नुसार, पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा घातला. त्यामध्ये काही लोक सापडले आहेत. काही ड्रग्ज वगैरेही सापडले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांकडून संपूर्ण ब्रिफींग घेतल्यानंतर यावर बोलू शकेल. मात्र त्या ठिकाणी गुन्हा घडल्याचे प्राथमिक स्तरावर दिसते आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
Devendra fadanavis : राज्यमंत्री बैठका घेऊ शकतात धोरणात्मक निर्णयासाठी मंत्र्यांची मान्यता आवश्यक
नागपूर जिल्ह्याचा पुढील ३० वर्षांचा ‘कॉम्प्रेहेन्सीव्ह मोबिलिटी प्लॅन’ सर्व लोकप्रतिनिधींसमोर ठेवण्यात आला आहे. राईट्स या संस्थेला हा प्लॅन तयार करण्यास सांगितला होता. या प्लॅनमध्ये काही अडचणी आहेत, त्या दूर करणे, रस्ते आणखी मोठे करणे, नवीन रस्ते निर्माण करणे, अंडरपास तयार करणे, उड्डाणपूल तयार करणे, बसेसची व्यवस्था करणे, ट्रॅफिक सिग्नल्सची व्यवस्था बघणे, फुटपाथची व्यवस्था आदी गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. लवकरच जनतेसाठी हा प्लॅन खुला केला जाईल आणि सुचना आमंत्रित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.