व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Suraj Chavan : सूरज चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ

Anjali Damania files defamation case : अंजली दमानिया यांनी दाखल केली मानहानीची केस

Mumbai ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर त्यांना पक्षातील पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

अंजली दमानिया यांनी याबाबत स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या म्हटले, सूरज चव्हाण यांना मी धडा शिकवणारच, असा निर्धार मी केला होता. त्यांनी मुद्दामहून माझ्याविरुद्ध सातत्याने खालच्या दर्जाची वक्तव्ये केली. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या सोबत त्यांनी एका जुन्या मुलाखतीची लिंकही जोडली आहे. या मुलाखतीत त्यांनी सूरज चव्हाण आणि त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

Ajit Pawar : अजित दादांचाचा रोहित पवारांवर ‘उपटसूंभ’ म्हणत टोला

त्यात बोलतान दमानिया म्हणाल्या होत्या, प्रत्येक पक्षाने आणि नेत्यांनी असे राम-शाम लोकं ठेवलेली आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोललं की भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड पुढे येतात. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बोललं की अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांना बोलायला लावतात. त्यांना बोलायचं ताळतंत्र नाही. विशेषतः सूरज चव्हाण यांना नाही.

त्यानंतर त्या म्हणाल्या, मिटकरी यांनी माझ्याविषयी फारसं काही वाईट बोललेलं नाही. त्यांनी फक्त शंका व्यक्त केली की माझ्याकडे पैसे कुठून येतात. कदाचित गुगल केलं असेल. पण सूरज चव्हाण यांचा संताप पाहून आता त्यांना सरळ करायचं आहे. फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या मालकांनाही धडा शिकवायचा आहे. मी किती तत्वनिष्ठ आहे हे अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांना माहीत आहे. पण चव्हाण यांना युवा मोर्चामधून काहीतरी दाखवायचं आहे, हे स्पष्ट दिसतं.

Devendra fadanavis : राज्यमंत्री बैठका घेऊ शकतात धोरणात्मक निर्णयासाठी मंत्र्यांची मान्यता आवश्यक

दरम्यान, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीमुळे सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. तसेच पक्षातूनही त्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा आहे. अशातच आता अंजली दमानिया यांनी थेट कोर्टात मानहानीचा दावा दाखल करत सूरज चव्हाण यांच्या अडचणी अधिकच वाढवल्या आहेत.

error: Content is protected !!