
advantage-vidarbha-2026-day-2-nagpur-investment-mous-fadnavis-replies-opposition : नागपुरात १०,८३१ कोटींची नवी गुंतवणूक, ॲडव्हांटेज विदर्भमध्ये दुसऱ्या दिवशी ३ मोठे सामंजस्य करार
Nagpur “महाराष्ट्रात होणारे सामंजस्य करार (MoUs) केवळ कागदावर नसून ते प्रत्यक्षात जमिनीवर साकारले जात आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. नागपूर येथे सुरू असलेल्या ‘ॲडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी शनिवारी १० हजार ८३१ कोटी रुपयांचे तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. दावोस भेटीवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी या गुंतवणुकीच्या माध्यमातून कृतीतून उत्तर दिले आहे.
विदर्भाच्या औद्योगिक नकाशावर नवे ठसे उमटवणारे हे तीन करार पुढीलप्रमाणे आहेत. गॅलक्सी सोलर एनर्जी ही कंपनी नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथे सोलर सेल आणि बॅटरी स्टोरेज सिस्टीमचे (BESS) उत्पादन होईल, ज्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ४ हजार रोजगार मिळतील.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनजवळ सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) ३५० खाटांचे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल. यात ६०० कोटींची गुंतवणूक असून १८०० तरुणांना संधी मिळेल. जीआर इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी टेलिकॉम टॉवर निर्मितीसाठी २०० कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगारांची निर्मिती होईल.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या आगामी धोरणांची दिशा स्पष्ट केली. येत्या ३ महिन्यांत लेदर, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस-डिफेन्स, फार्मास्युटिकल आणि बायो-प्लास्टिक यांसारख्या ७ महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी नवी धोरणे जाहीर केली जातील. महाराष्ट्र हे लॉजिस्टिक्स, एआय आणि सौर क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वाधिक एफडीआय आकर्षित करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Nagpur Municipal corporation : शिवसेनेचा ‘झिरो’ स्ट्राईक रेट; तरीही भाजप स्वीकृत सदस्य देणार?
या इंटरनॅशनल बिझनेस कॉनक्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त आणि ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट’चे अध्यक्ष आशिष काळे उपस्थित होते. गडकरी यांनी यावेळी विदर्भातील तरुणांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.








