Chief Minister claims that there is no place for corruption in the BJP : पदावरून हटविण्याची ताकद, प्रचाराचा नारळ फोडला
Buldhana भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराला कधीही आश्रय देत नाही. स्वतःच्या नगराध्यक्षाने चुकी केली तरी त्याला पदावरून हटवण्याची ताकद फक्त भाजपमध्येच आहे, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला.
सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, शहरीकरणाला कधीही अभिशाप समजू नका. शहरं हीच रोजगारनिर्मितीची मोठी केंद्रं आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 6.6 कोटी जनता चिखलीसारख्या सुमारे 400 शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरांचा विकास हा राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
“मी इथे कुणावर टीका करण्यासाठी नाही, तर विकासावर बोलण्यासाठी आलो आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले, “केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. विशेषतः ‘अमृत’ योजनेमुळे शहरी भागात मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी वेग आला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, आमदार आणि नगरपालिका – या चौघांचे एकत्रित नेतृत्व मिळाले तर शहराचा विकास वेगाने होईल.”
Local Body Elections : वंचितच्या उमेदवाराची माघार; शिवसेनेला मोठा दिलासा!
चिखली शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबद्दलही त्यांनी बोलताना, “हा पुतळा चिखलीकरांसाठी अभिमानाचे प्रतीक ठरेल,” असे सांगितले. त्याचबरोबर, शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीला बळ मिळण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारण्याची घोषणा देखील या सभेत करण्यात आली.








