Devendra Fadnavis : ‘नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा हवा’, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Chief Minister Insists on Having the Mayor from BJP : आमदारांचे वाढले टेंशन, महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता

Khamgao राज्यात महायुतीचा झेंडा फडकत असतानाच आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. भाजपाचे बुलढाणा जिल्ह्यातील चारही आमदारांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट संदेश दिला आहे — “मला आपलाच नगराध्यक्ष हवा!” या थेट सूचनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक लढत न राहता, आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

भाजपच्या रणनीतीनुसार १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. आकाश फुंडकर (खामगाव), चैनसुख संचेती (मलकापूर), डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), श्वेता महाले (चिखली) या आमदारांच्या मतदारसंघातील नगरपालिकांमध्ये भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे, अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Local Body Elections : ‘मलाच तिकीट द्या, निवडूनच येतो’, उमेदवारांच्या दाव्याने नेते हैराण

काही आमदारांनी आपल्या मतदारसंघातील सामाजिक समिकरण पाहता नगराध्यक्ष निवडून आणणे कठीण असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले असले, तरी बहुसंख्य आमदारांनी “नगराध्यक्ष भाजपाचाच होईल” असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पक्षीय मुलाखती, संघटन बैठकां आणि रणनीती ठरविण्याची हालचाल जोरात सुरू आहे.

Local Body Elections : महाविकास आघाडी एकजुटीच्या मार्गावर; भाजप उमेदवार निवडीच्या मागे

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मात्र, उमेदवार निवडण्याचा अंतिम निर्णय आमदारांच्या शिफारसी व पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेवर अवलंबून राहणार आहे. उमेदवाराचा सामाजिक प्रभाव, आर्थिक पार्श्वभूमी, आणि जनतेतली लोकप्रियता या निकषांवर अंतिम निवड होईल, असा अंदाज आहे.

महायुतीत असूनही भाजप आपले वर्चस्व वाढविण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. नगरपालिका निवडणूक ही ‘महायुतीतली आतली स्पर्धा’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.