Devendra Fadnavis : पॅनिक होऊ नका, पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा आहे!

cm devendra fadnavis appeals people for avoiding panic buying of petrol diesel : मुख्यमंत्र्यांचे आवाहन, काळाबाजार करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

Nagpur “राज्यात पेट्रोल, डिझेल आणि डीएपी खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ (घाबरून खरेदी) करू नये. विनाकारण रांगा लावल्यामुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, याचा फायदा घेऊन जर कोणी काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिला. नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या रांगांवर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, ‘केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की देशात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा अनेक शहरांत नागरिक घाबरून गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत आहेत. यामुळे डिमांड आणि सप्लाय’चे गणित बिघडत असून टंचाईची स्थिती निर्माण होत आहे. दर महिन्याला लागणारा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी रांगा लावू नयेत. तसेच, या परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी काळाबाजार करत असेल, तर प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करेल.’

Farmer id : शेतरस्त्यांवर अतिक्रमण केल्यास 5 वर्षे ‘फार्मर आयडी’ ब्लॉक !

भव्य आणि दिव्य’ रामनवमी शोभायात्रा
सुरुवातीला फडणवीस यांनी सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी आपल्याला मर्यादेचे महत्त्व शिकवले आहे. नागपूरची ही शोभायात्रा देशातील एक आगळीवेगळी यात्रा आहे. या यात्रेला मोठी परंपरा असून दरवर्षी याचे स्वरूप अधिक भव्य आणि दिव्य होत आहे, हे पाहून आनंद होतो.”