Devendra Fadnavis : हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप

cm-devendra-fadnavis-slams-harshvardhan-sapkal-over-shivaji-maharaj-tipu-sultan-comparison-row : छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना; माफीची मागणी

Mumbai: मालेगाव महानगरपालिकेतील वादातून पेटलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेचा मुद्दा आता राज्याच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची तुलना केल्याच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत हे वक्तव्य निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मोगलांच्या जोखडातून सामान्य रयतेची मुक्तता केली आणि लोककल्याणकारी राज्य उभे केले. अशा महान राजाची तुलना टिपू सुलतानसारख्या शासकाशी करणे हे अत्यंत चुकीचे आणि अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचे काम झाले आहे. हे अतिशय निंदनीय आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षात नैतिकता उरली असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी आणि पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Maharashtra agriculture : कृषी समृद्धी केंद्रांवरून राजकीय हालचाली वेगवान; आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचे संशोधन केले पाहिजे, असा टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र आणि देश हा “नवा इतिहास” खपवून घेणार नाही. तसेच मित्रपक्षांनीही या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे त्यांनी नमूद केले.

हा वाद मालेगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित उपमा पोरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यानंतर उद्भवला. समाजवादी पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या उपमहापौरांच्या या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना शिंदे गटाने तीव्र आक्षेप घेतला. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत महापालिकेच्या नगरसेवक विभागाने हस्तक्षेप करून संबंधित छायाचित्र दालनातून काढून टाकले.

Divyang protest : ‘त्या’ तक्रारींचे पुढे काय झाले? दिव्यांगांच्या प्रश्नांवर आश्वासनांची सरबत्ती

 

या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेचे वक्तव्य राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरले आहे. राज्यात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या संदर्भातील संवेदनशीलतेमुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला असून, पुढील काही दिवसांत या वादावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू राहण्याची शक्यता आहे.

__