Devendra Fadnavis : ‘आता तरी गप्प बसा!’; फडणवीसांनी थेट सुनावले

cm-fadnavis-slams-mahayuti-leaders-dirty-politics-ajit-pawar-death : अजितदादांच्या निधनानंतर सुरू असलेल्या राजकारणावर मुख्यमंत्री कडाडले

Nagpur महाराष्ट्र ज्यांच्या निधनाचे दुःख पचवत आहे, त्याच अजित पवारांच्या नावावर महायुतीतील नेत्यांनी सुरू केलेले ‘सूडाचे आणि स्वार्थाचे राजकारण’ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम अखेर सुटला. “अजितदादांसारखा महान नेता आपल्यातून गेला आहे, त्यांचे नाव घेऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचे हे खालच्या स्तरावरचे उद्योग तातडीने बंद करा,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना नागपुरात अक्षरशः झोडपून काढले.

अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीत एकोपा राहण्याऐवजी नेत्यांनी एकमेकांच्या उरावर बसण्याची सुरू केलेली स्पर्धा पाहून राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होत आहे. वादाची ठिणगी शिवसेना नेते रामदास कदम यांनी टाकली. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हल्ला चढवला.

Mayoral election : प्रदेशाध्यक्षांचा आदेश, मात्र कारवाई वेगळी; जोरगेवारांची पुन्हा बंडखोरी!

“सुनील तटकरेंना भीती होती की शरद पवार पुन्हा आले तर त्यांचा ताबा जाईल, म्हणून त्यांनी अजितदादांच्या अर्थी सावडण्याआधीच सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकून घेतला,” असा सनसनाटी आरोप कदम यांनी केला. या विधानामुळे महायुतीत केवळ फूट पडली नाही, तर वैयक्तिक आकस किती टोकाला गेला आहे, हे महाराष्ट्राने पाहिले. अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल करून मित्रपक्षावरच वार करण्याच्या या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र प्रहार केला आहे.

Sanjay Rathod : यवतमाळच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’! ६९२.७४ कोटींच्या वार्षिक आराखड्याला पालकमंत्र्यांची मंजुरी

“कुणी स्वतःच्या अधिकारांसाठी तर कुणी वर्चस्वासाठी राजकारण करत आहे, हे अत्यंत घृणास्पद आहे,” अशा टोकदार भाषेत फडणवीसांनी महायुतीमधील ‘कलहबहाद्दरांना’ आरसा दाखवला. सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या ज्या चर्चा राजकीय चिखलफेकीसाठी वापरल्या जात आहेत, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट बजावले की, हे सर्व वाद निरर्थक असून यातून केवळ महाराष्ट्राची बदनामी होत आहे.

आता मुख्यमंत्र्यांच्या या तडाख्यानंतर रामदास कदम तलवार म्यान करणार की महायुतीमधील ही ठिणगी वणवा बनणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.