CM upset with Ajit Pawar for not keeping his word : “आम्ही शब्द पाळला, पण दादांनी विश्वासघात केला”; उपमुख्यमंत्र्यांवर जाहीर संताप
Pune पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना महायुतीमध्ये मोठा विसंवाद समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शब्द न पाळल्याचा गंभीर आरोप करत आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात गोखलेनगर येथील जाहीर सभेनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी अजित पवारांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आमच्यामध्ये असे ठरले होते की ही लढत मैत्रीपूर्ण असेल आणि प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध बोलणार नाहीत. आम्ही आमचा शब्द पाळला, परंतु अजित पवारांनी मात्र तो मोडला. त्यांनी भाजपावर टीका करत प्रचाराची पातळी ओलांडली. दादांनी असे का केले, हे मला माहीत नाही.” फडणवीसांच्या या विधानामुळे निवडणुकीच्या तोंडावर युतीमधील तणाव चव्हाट्यावर आला आहे.
Election Guidelines : दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचा ‘रामबाण’ उपाय; आता दाखवावी लागणार २ ओळखपत्रे!
अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत असतानाच फडणवीस यांनी एक सूचक विधानही केले. “आमचा इतिहास पाहिला तर आम्ही विरोधकांनाही सोबत घेतो. दादा पुण्यात आमचे विरोधक आहेत, परंतु राज्याच्या राजकारणात ते आमचे विरोधक नाहीत,” असे म्हणत त्यांनी भविष्यातील युतीचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत, असेही संकेत दिले. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी दिलेल्या काही आश्वासनांवर त्यांनी कडाडून टीका केली, ज्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Municipal Election : घराघरात प्रचाराला मुभा दिली का? कोड्यात बोलू नका, हिम्मत असेल तर थेट सांगा
या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला आहे. “मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह सर्व महत्त्वाच्या शहरांमधील जनतेने भाजपला निवडून देण्याचे नक्की केले आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी मतदारांची ही मानसिकता बदलणार नाही,” असे ते म्हणाले. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानात पुण्याची जनता फडणवीसांच्या बाजूने कौल देते की अजित पवारांच्या ‘पॉवर’ला साथ देते, हे आता स्पष्ट होईल. १६ जानेवारीच्या मतमोजणीकडे आता संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.








