Important statement about Raj Thackeray is under discussion : राज ठाकरेंबाबतचं महत्त्वाचं वक्तव्य चर्चेत
Mumbai : दोन दिवसांपूर्वीच मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाऊणतास चर्चा झाली होती. या भेटीनंतर महायुतीसोबत मनसेचा मार्ग मोकळा होतोय का, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र आता फडणवीसांनी स्पष्ट वक्तव्य करत सर्व अटकळींना पूर्णविराम दिला आहे.
लोकांनी भ्रमित होण्याचं काही कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण भेटायला आलं यावरून युती ठरत नाही किंवा त्यावरून राजकारण होत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल आणि महायुतीच विजयी होईल, असे फडणवीस म्हणाले.
शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी खिल्ली उडवत म्हटलं की, मला एक गालिबचा शेर आठवतो ‘दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…’ सत्य स्वीकारलं नाही तर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील. 2014 मध्ये मोदी जिंकले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेस 15-15 वर्षे सत्तेत होती. विरोधक जोवर अभ्यास करत नाहीत की जनता आपल्याला का नाकारतेय, तोवर ते जिंकणार नाहीत. लोकांचा अपमान करणारे कधीच निवडून येणार नाहीत.
Maratha movement : मनोज जरांगेच्या बैठकीला पैशांचा पुरवठा कोण करतो?
दरम्यान, लाडकी बहीण योजनेंतर्गत तब्बल 26 लाख लाभार्थी बोगस असल्याचं उघड झालं आहे. या विषयावर विचारणा होताच फडणवीस म्हणाले की, आमची चौकशी सुरू आहे. जे चुकीचा लाभ घेणारे आहेत त्यांचा लाभ तत्काळ बंद केला जाईल.
____