Nagpur-walkable-street-becoming-drugs-street-devendra-fadnavis : मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, असामाजिक कृत्यांची गंभीर दखल
Nagpur नागपूर महानगरपालिकेचा कोट्यवधींचा ‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, या परिसरात होणाऱ्या असामाजिक कृत्यांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. यापुढे वॉकेबल स्ट्रीटवर अमली पदार्थांचे सेवन किंवा कोणतीही गुन्हेगारी घटना घडल्यास, त्यास संबंधित पोलीस निरीक्षक यांना थेट जबाबदार धरले जाईल, अशी कडक तंबी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रकल्पाचा भांडाफोड केला. अभ्यंकर नगर चौक ते काचीपुरा चौक या मार्गावर राबवण्यात आलेला हा प्रकल्प पूर्णपणे फसला असून, तो आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. २० कोटी रुपये खर्चून तयार झालेली ही ‘वॉकेबल स्ट्रीट’ आता ‘ड्रग्स स्ट्रीट’ म्हणून ओळखली जात आहे. सायकल ट्रॅक आणि बसण्याच्या जागांवर रात्रीच्या वेळी खुलेआम दारू पिणे आणि ड्रग्सचे सेवन चालते.
Vidarbha sahitya sangha : ‘टपाल’ मतपत्रिकेवरून वादाचा धुरळा; ‘ती’ २ हजार मते कुणाची?
आधीच चांगला असलेला रस्ता खोदून पुन्हा तयार करणे अनावश्यक होते. रस्त्याची रुंदी कमी केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून पार्किंगची कोणतीही सोय नाही. या परिसरात छेडछाड आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
Chandrakant patil : अनुदानित महाविद्यालयांत प्राध्यापकांची मोठी भरती
याची मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ते म्हणाले की, सार्वजनिक निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या सुविधांचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. या परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यास संबंधित पोलीस स्टेशनच्या निरीक्षकावर कठोर कारवाई केली जाईल. अमली पदार्थ विक्री आणि असामाजिक कृत्ये रोखण्यासाठी या भागात तातडीने ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पातील त्रुटी आणि निधीच्या वापराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विचाराधीन आहे. ज्या रस्त्यावर नागरिकांनी फिरणे अपेक्षित होते, तिथे जर गुन्हेगार फिरत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांना या भागात गस्त वाढवण्याचे आणि गुन्हेगारांवर कडक प्रहार करण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.








