Devendra Fadnavis : पुतण्या मुख्यमंत्री, तरीही काकूंवर आली आंदोलनाची वेळ!

 

Shobha Fadnavis’ protest against government policies : देवेंद्र फडणविसांना ‘घरचा आहेर’; शोभा फडणवीस उपसणार आंदोलनाचे हत्यार

Chandrapur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचाच आहेर मिळाला आहे. त्यांच्या काकू माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी पुतण्याच्याच धोरणांविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत Hot Topic म्हणून या घटनेची चर्चा होत आहे.

राज्य सरकारच्या वाळू धोरणावर शोभा फडणवीस कमालीच्या नाराज आहेत. घरकुल योजनेला वाळू उपलब्ध करून दिली नाही तर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव रखडलेले आहेत. केंद्र व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत गरिबांसाठी घरकुल बांधण्यात येत आहे.

मात्र वाळू घाटच खुले नसल्यामुळे आणि जिल्ह्यात वाळू उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो घरकुल अपूर्णावस्थेत आहेत. काहींनी घरकुल बांधकाम सुरू केले असल्यामुळे दुसरीकडे भाड्याने राहात आहेत. त्यांना अतिरिक्त घरभाड्याचा बोजा सहन करावा लागत आहे. बहुसंख्य घरकुलाची कामे सुरू झालेली नाहीत. काहींचे वाळू अभावी घरकुल अर्धवट आहे तर काही लाभार्थी वाळू घाट खुले होण्याची वाट बघत आहेत.

Jayant Patil : पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होता काय ?

अधिकारी म्हणतात, ‘आम्ही काहीच करू शकत नाही’

वाळू घाट खुले करण्याबाबत मुल तालुक्यातील हळदी, उधळपेठ, उसराळा, चिंमढा येथील लाभार्थ्यांनी शोभा फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर फडणवीस यांनी २६ मार्च २०२५ ला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,बी. डी.ओ. सरपंच यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये वाळू घाट सुरु करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, अधिकाऱ्यांनी, ‘वाळू प्रश्न शासन स्तरावरचा असल्याने आम्ही काही करु शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांशी बोला’, असं उत्तर दिलं.

CM Devendra Fadnavis : आरोग्य सेवेतील ‘त्या’ 680 पदांची सरळसेवेने भरती

या एकूणच परिस्थितीवर शोभा फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. लवकरात लवकर वाळू घाट खुले झाले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुतण्या मुख्यमंत्री असतानाही काकूंवर आंदोलनाची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे बघावे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.