Devendra Fadnavis : निवडणुकीपूर्वीच भाजपचा मोठा डाव, राज्यात ‘भाकरी फिरणार’!

Fadnavis bold decision before local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी फडणवीसांचा धडाकेबाज निर्णय

Mumbai : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ढोल वाजू लागले आहेत आणि संपूर्ण राज्यभर निवडणुकीची रणधुमाळी तापत चालली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या धामधुमीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम समोर येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीचा जोर वाढला असताना आता भाजपने असा एक निर्णय घेतला आहे की, राज्याच्या राजकारणात “भाकरी फिरणार” अशी चर्चा जोर धरत आहे.

मुंबईत एका विशेष संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी संवाद साधताना मोठा राजकीय ‘गेम चेंजर’ ठरणारा निर्णय जाहीर केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही तरुणांना सर्वाधिक संधी देणार असून किमान 40 टक्के जागा या 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गजबज माजली आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापली जाऊ शकतात, तर अनेक नव्या चेहऱ्यांना अचानक राजकारणात स्पॉटलाइट मिळणार असल्याचं समीकरण पुढे सरकत आहे.

Dharmendra passed away : हिंदी सिनेमाचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन

भाजपने घेतलेला हा निर्णय थेट नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच महापालिका अशा सर्व निवडणुकांवर लागू होणार असल्याने तिकीट वाटपात मोठे बदल दिसणार हे निश्चित मानले जात आहे. तरुणांना पुढे करून भाजपने निवडणुकांमध्ये मूड बदलण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही काही दिवसांपूर्वीच तरुणांना अधिकाधिक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी झालेल्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, तरुणांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी द्या. त्यानंतर आता भाजपनेही अशीच भूमिका घेतल्याने राज्यातील निवडणूक लढत तरुणांच्या भोवती फिरताना दिसू शकते. राजकारणातील पुढची पिढी केंद्रस्थानी येणार का, हा प्रश्न आता चर्चेत आहे.

Gauri garje death case : गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात दमानियांचा पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील निवडणूक तापमान चांगलेच वाढलेलं असताना भाजपचा हा मोठा राजकीय डाव निश्चितच चर्चेत आला आहे. येत्या काही दिवसांत तिकीट वाटप, अंतर्गत नाराजी आणि तरुणांच्या नव्या लाटेमुळे राज्यातील निवडणूक गणिते वेगाने बदलू शकतात अशी चर्चा आहे.