5,000 Devotees Embrace Buddhism on the Very First Day : धम्मदीक्षेनंतर झाले प्रमाणपत्रांचे वाटप
Nagpur : नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर तीन दिवसीय ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला सुरूवात झाली आहे. काल (३० सप्टेंबर) पहिल्याच दिवशी जवळपास पाच हजार अनुयायांनी श्रामणेर दीक्षा घेतली. जपानहून ३० प्रतिनिधींचा एक संघ येथे आलेला आहे. त्यांपैकी काही बांधवांनी श्रामणेरची दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीतर्फे आणि भिक्खू संघाच्या सहकार्याने धम्मदिक्षेचा कार्यक्रम अव्याहतपणे राबवला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदिक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस हा धम्मदीक्षा सोहळा चालणार आहे. यामध्ये देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या उपासक, उपासिका, अनुयायी यांना भिक्खू संघातर्फे दीक्षा देण्यात येते.
Dussehra Festival Event : आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष !
भदंत सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचावर भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते अश्र्वजित, भंते धम्मविजय, भंते महानागा, भंते कश्यप, भंते बुद्धघोष, भंते धम्मप्रकाश, भंते मिलद, भंते धम्मशील, भंते संघ शांतीनागा उपस्थित होते. काल सकाळी ९.३० वाजता भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी बुद्ध वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात केली. नंतर धम्मदिक्षेचा कार्यक्रम सायंकाळपर्यंत सुरू होता. धम्मसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी धम्मदीक्षा घेणाऱ्यांचे अर्ज भरून घेत होते.
Pankaj Bhoyar : अहिल्यानगरमधील परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेऊ नका !
एका अर्जावर एकाच कुटुंबातील जास्तीत जासात पाच अनुयायांच्या नावांची नोंदणी करण्यात आली. धम्मदीक्षा घेतल्यानंतर त्या सर्वांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. धम्मसेनेचे दीपक मुंघाटे, गणेश दुपारे यांच्यासह पदाधिकारी आणि भिक्खूसंघ त्यांना सहकार्य करत आहेत. दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी आहे. येथून मिळालेल्या ऊर्जेमुळे जीवनात सकारात्मकता येते. उपासक, उपासिका आणि अनुयायी मोठ्या संख्येने येथे येऊन धम्मदीक्षा घेतात, असे भदंत ससाई यांनी सांगितले.