Former minister writes emotional post over worker’s death : साखर कारखान्यातील घटना, भावनिक पोस्ट लिहून व्यक्त केला शोक
Beed बीड जिल्ह्यातील परळी येथील विकास सहकारी साखर कारखान्यात काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे माजी मंत्री धनंजय मुंडे भावुक झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून शोक व्यक्त केला आहे.
परळीतील विकास सहकारी साखर कारखान्यात काम करणाऱ्या ५५ वर्षीय कर्मचाऱ्याचा कामाच्या ठिकाणीच अपघात होऊन मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत कर्मचाऱ्याचे नाव गणेश डोंगरे असून धाराशिव येथील साखर कारखान्याच्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याविषयी धनंजय मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “परिस्थितीने अत्यंत गरीब पण स्वाभिमानाने ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबीयांचे निर्वहण करणाऱ्या आमच्या या बांधवाच्या अकाली निधनानंतर त्याचे मुले-बाळे व कुटुंब उघड्यावर पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ”
तसेच “राज्य शासनाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची लेखी मागणी शासनाकडे करणार आहे. ऊसतोड कामगारांचे नेहमी घडणारे अपघात तसेच त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक संरक्षण व स्थैर्य याबाबत राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मी प्रस्तावीत केलेल्या योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.” असेही मुंडे म्हणाले.
या अपघातानंतर कारखान्यातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कामगार संघटनांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कारखान्यात काम करताना सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी कितपत होते, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
Municipal elections : ‘माझ्या पतीविरोधात…’ नवनीत राणांच्या भूमिकेचं बच्चू कडूंकडून कौतुक
धनंजय मुंडे यांनी या घटनेनंतर तातडीने काही मागण्या केल्या आहेत. मात्र सरपंच देशमुख यांच्या हत्येबाबत आपण काहीही का बोलले नाहीत, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.








