Dharma swatantrya bill : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला विधानपरिषदेतही मंजुरी

maharashtra-dharma-swatantrya-bill-approved-legislative-council-pankaj-bhoir-2026 : वादळी चर्चेनंतर कायद्याचा मार्ग मोकळा

Mumbai: महाराष्ट्र विधानपरिषदेत वादळी चर्चेनंतर धर्म स्वातंत्र्य विधेयकाला अखेर बहुमताने मंजुरी देण्यात आली असून विधानसभेमध्येही हे विधेयक मंजूर झाले होते. त्यामुळे आता राज्यात धर्म स्वातंत्र्याचा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्यात बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या असून दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधेयकावर उत्तर देताना सांगितले की, धर्मांतर करण्यापूर्वी ६० दिवस आधी नोटीस देण्याची अट ही बळजबरीने धर्मांतर होत नाही ना याची खात्री करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. विरोधकांकडून आकडेवारीची मागणी केली जात असली तरी ज्या ठिकाणी कायदाच अस्तित्वात नाही, तेथे आकडेवारी कशी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाल्यास प्रभावीपणे गुन्हा दाखल करता यावा यासाठी या विधेयकात तरतुदी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

IMD Weather Alert : महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा

गेल्या आठवड्यात विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर विधानपरिषदेतही दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादविवाद झाला. अखेरीस बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर करण्यात आले.

दरम्यान, अनिल परब यांनी या विधेयकाला समर्थन देताना काही मुद्द्यांवर स्पष्टीकरणाची गरज असल्याचे नमूद केले. हे विधेयक धर्मांतराबाबत आहे की पक्षांतरासारख्या बाबींचाही समावेश आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फसवणूक, आमिष दाखवणे, दिशाभूल करणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश या विधेयकात असल्याचे त्यांनी सांगितले आणि राज्यात नेमक्या कोणत्या भागात आणि कोणत्या कारणांमुळे धर्मांतर घडते याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अनिल परब यांनी सरकारच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, जर धर्मांतराच्या घटना वाढत असतील तर त्यामागे प्रशासनाचे अपयश आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजात गरिबीचा गैरफायदा घेत धर्मांतर केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पूर्वी घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करत त्यांनी या विषयावर सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Vikas thakre vs narendra jichkar : काँग्रेसची ठाकरे सेना आता जिचकारांच्या आर्थिक नाड्या आवळणार !

विधानपरिषदेत या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले, मात्र अखेरीस विधेयकाला बहुमताने मंजुरी मिळाल्याने राज्यात धर्म स्वातंत्र्य कायदा लागू होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.