Dharmendra passed away : हिंदी सिनेमाचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन

Bollywood mourns death of actor passed away at age of 89 : ८९व्या वर्षी घेतला निरोप, बॉलीवूड वर शोककळा

mumbai : हिंदी सिनेमाचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना काही दिवसापूर्वी मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण उपचारा नंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली होती नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते त्यांनी जगाचा निरोप घेतला.

या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती.

त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा हसरा फोटो शेअर केला होता आणि चाहत्यांना त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, “धरमजी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, कृपया त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.” त्यानंतर ते रुग्णालयात असतानाच त्यांच्या निधन झाल्याची अफवा आपसरली होती. मात्र उपचारानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली घरीच उपचार करण्यात येत होते.

Gauri garje death case : गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात दमानियांचा पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप

धर्मेंद्र यांनी तब्बल सात दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. १९६० मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं आणि २०२४ मध्ये आलेल्या तेरी बातों में ऐसा उलझा जिया पर्यंत त्यांनी काम केलं. त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं नाव इक्कीस असून तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता.

पंजाबमधील लुधियाणा जिल्ह्यातील नसराली गावातून आलेल्या या जट्ट मुलाने दिलीप कुमार आणि मोतीलाल यांना पाहून अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं. वडील शाळाशिक्षक असताना मुलाने मुंबई गाठली आणि १९५८ मध्ये फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकत पहिला ब्रेक मिळवला. अर्जुन हिंगोरानी यांच्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांना पहिली ओळख दिली.

Local body election : ठाकरे गटाला धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार !

बंदिनी (१९६३) आणि फूल और पत्थर (१९६६) यांनी धर्मेंद्र यांना स्टार बनवलं. त्यानंतर शोले, चुपके चुपके, यादों की बारात, धरम वीर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दमदार शरीरयष्टी, देखणं व्यक्तिमत्त्व आणि दिलदार स्वभावामुळे ते ‘ही-मॅन ऑफ बॉलीवुड’ ठरले.

धर्मेंद्र यांचा गोड पंजाबी स्वभाव आणि रागाचा आवेश प्रेक्षकांना भावायचा. सलमान खान यांनी त्यांना “सर्वात देखणा पुरुष” म्हटलं होतं, तर दिलीप कुमार म्हणाले होते, “देवाने मला धर्मेंद्रइतका सुंदर का बनवलं नाही?” अशा व्यक्तिमत्त्वाने धर्मेंद्र यांनी चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं.

वैयक्तिक आयुष्यात धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले — पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी अभिनेत्री हेमा मालिनी. त्यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल यांनीही चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. देओल कुटुंबासाठी हा काळ अत्यंत वेदनादायी ठरला आहे. सनी देओल यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटलं, “पापा फक्त आमचेच नाहीत, तर संपूर्ण भारताचे होते.”

धर्मेंद्र यांचा प्रवास हा एका ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणाने स्वप्नांच्या नगरीत यश मिळवण्याची एक प्रेरणादायी कहाणी आहे. संघर्ष, मेहनत, नम्रता आणि यशाचा सुंदर संगम असलेलं हे आयुष्य आता इतिहासात कोरलं गेलं आहे.

______