Digital Census : १८७२ नंतर पहिल्यांदाच ‘पेपरलेस’ जनगणना; २०२७ साठी मेहकर तालुक्यात जय्यत तयारी

 

Mobile App Registration for Census 2027 : १८० घरे किंवा ८०० लोकसंख्येसाठी एक प्रगणक; मोबाइल अ‍ॅपद्वारे होणार हायटेक नोंदणी

Dongao/Mehkar : १८७२ नंतर पहिल्यांदाच ‘पेपरलेस’ जनगणना; २०२७ साठी मेहकर तालुक्यात जय्यत तयारीभारताच्या जनगणना इतिहासात १८७२ नंतर प्रथमच एक मोठे परिवर्तन घडून येणार आहे. २०२७ मध्ये होणारी जनगणना पूर्णपणे ‘पेपरलेस’ होणार असून, मेहकर तालुक्यात यासाठी प्रगणक गट तयार करण्याच्या मोहिमेला ५ जानेवारीपासून वेग आला आहे. महसूल, नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी कंबर कसली असून, आता कागदाऐवजी थेट मोबाइल अ‍ॅपवर नागरिकांची नोंदणी केली जाणार आहे.

जनगणना प्रक्रिया अधिक अचूक आणि जलद करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियमावली तयार केली आहे. १८० घरे अथवा ८०० लोकांच्या लोकसंख्येवर एक ‘प्रगणक गट’ (Enumeration Block) तयार केला जात आहे. सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक (Supervisor) नियुक्त केला जाणार असून, या सर्वांना मास्टर ट्रेनरमार्फत डिजिटल प्रशिक्षत केले जाईल. ग्रामीण भागासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी, तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे ‘जनगणना अधिकारी’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

Chikhali Politics : चिखलीत सत्ताधारी–विरोधकांचा सूर जुळला! गढूळ राजकारणात सलोख्याची ‘तुरटी’

तालुक्यातील ९८ ग्रामपंचायती आणि १६० महसुली गावांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागाची अंदाजित लोकसंख्या २ लाख ८६ हजार १९८ इतकी आहे. डोणगाव पॅटर्न: डोणगावची लोकसंख्या २६ हजार ७८८ असून, येथे एकूण ३३ प्रगणकांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरी भाग: २०११ च्या जनगणनेनुसार मेहकरची लोकसंख्या ४५ हजार होती, मात्र आता वाढलेल्या लोकसंख्येनुसार नवीन प्रगणक गट तयार करण्याचे काम नगरपालिकेकडून सुरू आहे.

Kishor Garole : मेहकरच्या नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’; पदभार स्वीकारताच स्वच्छता अभियान

५ जानेवारी रोजी डोणगाव येथे ग्राम महसूल अधिकारी अनूप नरोटे, अमोल राठोड, पल्लवी गुंठेवार, सीमा चव्हाण आणि महसूल सहाय्यक संतोष मानवतकर यांनी प्रत्यक्ष सर्वे करून प्रगणक गटांची निर्मिती केली. डिजिटल अ‍ॅपमुळे माहिती संकलित करताना होणाऱ्या चुका कमी होतील आणि जनगणनेची आकडेवारी लवकर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.