व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Kishor Garole : मेहकरच्या नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’; पदभार स्वीकारताच स्वच्छता अभियान

Kishor Garole : मेहकरच्या नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’; पदभार स्वीकारताच स्वच्छता अभियान

Mehkar Municipal Council starts ‘Cleanliness Drive’ : २६ जानेवारीपर्यंत शहर चकाचक होणार; नगराध्यक्षांची ‘काम आणि नियोजन’ त्रिसूत्री

Mehkar नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी विराजमान होताच किशोर गारोळे यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे वेगाने हलवण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन ‘काम, स्वच्छता आणि नियोजन’ ही त्रिसूत्री जाहीर केली. या नव्या कार्यकाळाची सुरुवात ६ ते २६ जानेवारी या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या शहरव्यापी स्वच्छता अभियानाने करण्यात आली आहे.

पदग्रहण सोहळ्यानंतर आयोजित सहविचार सभेत नगराध्यक्षांनी शहरातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी विकासकामांचा आढावा घेतला. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शहराचा विकास करताना सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रभागांनुसार कामांचे प्राधान्य ठरवण्यावर या बैठकीत एकमत झाले.

Ravindra Chavhan : विलासराव देशमुखांच्या ‘अपमाना’वरून देऊळगाव राजात रणकंदन

मंगळवार, ६ जानेवारी रोजी बालाजी सारंगधर येथील मंदिरात दर्शन घेऊन या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अभियानांतर्गत शहरातील सर्व १३ प्रभागांमधील रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई केली जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेना (उद्धव गट), युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पुढाकार घेतला आहे.

Eknath Shinde : खामगावात भाजपला धक्का; हिंदुत्ववादी नेता शिवसेनेत

या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्ष किशोर गारोळे, गटनेते विलास चनखोरे, नगरसेवक सतीश ताजने, महेश रिंढे, नितीन तुपे, रूपाली गारोळे, अन्सारी अफिया निसार अहमद यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षांनी पदभार घेताच ज्या पद्धतीने स्वच्छतेचा अजेंडा हाती घेतला आहे, त्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत असून मेहकरच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!