Breaking

Digital Registration : सीईओंना भेटण्यासाठी क्यूआर कोड अनिवार्य!

QR code mandatory to meet Zilla Parishad CEOs : जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या डिजीटल नोंदणीची नवी पद्धत

Amravati जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांना भेटण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. या नव्या पद्धतीमुळे कोण, केव्हा आणि कोणत्या कारणासाठी आले, याची संगणकीकृत नोंद ठेवली जाणार आहे.

जिल्हा परिषद सीईओंना भेटण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावर लावलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये भेटणाऱ्याचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करावा लागेल. त्यानंतर सीईओंच्या कार्यालयातून भेटीसाठी वेळ निश्चित केली जाईल.

Mahayuti Government : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा, प्रशासन लागले कामाला

सीईओ संजीता महापात्र यांनी सांगितले की, या पद्धतीमुळे बदली, नवी योजना, कार्यालयीन अडथळे यांसारख्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अचूक डिजिटल नोंद राहील. यामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ होईल.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने थोपटले दंड!

अभ्यागतांसाठी मात्र ‘क्यूआर कोड’ स्कॅन करणे बंधनकारक नाही. त्यांना पारंपरिक पद्धतीने चिठ्ठी पाठवून वेळ मागण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीपैकी कोणताही मार्ग निवडता येतो, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.