Dilip Sananda also on the verge of leaving Congress? : मुंबईत एकनाथ शिंदेंची घेतली भेट, काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा
Khamgao काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यानंतर स्थानिक काँग्रेसमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली. सपकाळ यांचे पुनर्वसन आहे की इतरांना इशारा आहे, अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून शिंदे सेनेचा मार्ग धरला. आता माजी आमदार दिलीप सानंदा देखील काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे आणि नेते गणेश राजपूत यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. आता खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचीही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ११ मार्च रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्याची माहिती आहे.
Vijay Wadettiwar : अर्थसंकल्पात ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे ?
बुलढाण्याचे शिवसेना आमदार आणि जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे चर्चेला बळ मिळाले. सानंदा यांनी मात्र शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं आहे. आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसमधील अनेकांनी पक्ष साेडला आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभाेरे यांनी तर १०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाेबत शिंदे सेनेत प्रवेश घेतला आहे.
Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी पायावर धोंडा मारून घेतला !
सानंदांचा दबदबा कमी झाला
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या काळात दिलीपकुमार सानंदा यांचा काँग्रेसमध्ये दबदबा होता. मात्र, देशमुख यांच्या निधनानंतर त्यांची राजकीय ताकद घटली. २०१९ मध्ये काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचा पराभव झाला, असे बोलले गेले. मात्र, नव्या चर्चा फेटाळत सानंदा यांनी काँग्रेस न सोडण्याचा दावा केला आहे. ‘मी काँग्रेसमध्येच राहणार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.