Dilipkumar Sananda : ‘सेफ’ राहण्यासाठी गेलेले सानंदा आता असुरक्षित?

Audio of conversation with father goes viral on social media : सानंदा–वडिलांच्या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Khamgao राजकारणात प्रत्येक नेता स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. अनेकांचे हे प्रयत्न यशस्वी ठरतात, तर काहींना नियमबाह्य कृतींची मोठी किंमत मोजावी लागते. राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीत अनेक नेत्यांसाठी सत्ताधारी गट ‘सेफ’ ठरले असले, तरी काहींसाठी तीच सुरक्षितता आता डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा त्याग करून सुमारे सहा महिन्यांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. हा प्रवेश केवळ ‘सेफ’ राहण्यासाठी केला असल्याचा दावा असलेला त्यांचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे सेफ राहण्यासाठी गेलेले सानंदा आता असुरक्षित झाल्याच्या चर्चा संपूर्ण मतदारसंघात रंगू लागल्या आहेत

Mahayuti Government : २३ महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; सरकारच्या उदासीनतेविरोधात देऊळगाव राजात संताप

सानंदा यांनी आपले वडील गोकुलचंद सानंदा (बाबा) यांच्याशी केलेल्या कथित संभाषणाचा हा ऑडिओ असून, त्यात त्यांनी पक्षप्रवेशामागील कारणे स्पष्ट शब्दांत मांडल्याचा दावा केला जात आहे. संबंधित ऑडिओमध्ये सानंदा यांच्या शब्दांत असे नमूद असल्याचे ऐकायला मिळते की, काँग्रेस–राष्ट्रवादीतील मतांचे विभाजन झाल्यास भाजपलाच फायदा होतो, तसेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश हा पक्ष वाढवण्यासाठी नव्हे, तर स्वतः सुरक्षित राहण्यासाठीच करण्यात आल्याचे ते म्हणतात.

हा ऑडिओ यापूर्वीही काही प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर गेल्या दोन दिवसांपासून हा संभाषणाचा ऑडिओ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सानंदा यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Maratha reservation : मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग

दरम्यान, या ऑडिओची सत्यता किंवा असत्यता याबाबत सत्तावेध कोणतीही अधिकृत पुष्टी करत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संभाषणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, विविध अंदाज आणि तर्क मांडले जात आहेत.