Breaking

District Hospital : उपचारासाठी आला, महिला कर्मचाऱ्याची छेड काढली!

 

A patient who came for treatment molested a female employee : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकाराने संताप

Wardha उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपीने रुग्णालयातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्याची छेड काढली. ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराने रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्री एका आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या कैजुअल्टी विभागात उपचार करून त्याला ऑर्थो वॉर्डात भरती करण्यात आले होते. दरम्यान, रात्री ११:३० वाजताच्या सुमारास वॉर्डात सेवेत असलेली वर्ग चारची कर्मचारी वॉर्डातील रुममध्ये कामानिमित्त गेली होती.

दरम्यान, खोलीत कोणी नसल्याची संधी साधून भरती केलेला आरोपी त्या खोलीत शिरत महिला कर्मचाऱ्याची छेड काढली. महिला कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला असता उपस्थित वॉर्डातील स्टाफ आणि वॉर्डबॉयने आरोपीला खोलीतून बाहेर काढले. घटनेची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक यांना देण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सकांनी घटनेचा आढावा घेत प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Wardha District Hospital : तानाजी सावंत यांच्या काळात नागपूरच्या रुग्णालयाशी ‘आर्थिक’ करार?

जिल्हा सामान्य रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून ही यंत्रणा आजारी असल्याचे चित्र आहे. महिला कर्मचारी छेडखानीची घटना घडली. त्या वॉर्डातील सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले.

रुग्णालयात दाखल आरोपीबरोबर एक पोलिस कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र, आरोपीला सोडून कर्मचारी गेल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा रुग्णालयात जोर धरत आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

Wardha District : गावकऱ्यांवर ४३ कोटी कराची थकबाकी!

उपचारासाठी दाखल रुग्ण मानसिक आजारी असल्याचे दिसून आल्याने घटनेनंतर त्याला पुन्हा कॅजुअल्टी विभागात दाखल केले आहे. तेथे त्याला बांधून ठेवून मानसिक रुग्ण विभागातील डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले जात असल्याचे माहिती आहे. सोमवारी त्याला नागपूर मेंटल हॉस्पिटल येथे पाठविणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

माहिती मिळताच घटनास्थळी भेट घेत घटनेचा आढावा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची चौकशी केली असता ते बंद असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीसंदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे वारंवार तक्रार केली. मात्र, अद्याप याची दखल घेतली गेली नाही. रुग्ण मानसिक आजारी असल्याने दिसून आले. त्यानुषंगाने उपचार केले जात आहेत.