Wine bar owner’s hunger strike suspended : वाईन बार मालकाचे आमरण उपोषण स्थगित
Akola जिल्हा वाईन बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्या यश वाईन बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या सील कारवाईच्या विरोधात त्यांनी उपोषण पुकारले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.
सोमवारी विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. पवनीकर व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतली आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांशी थेट संपर्क साधला. आयुक्तांनी तातडीने सील उघडण्याचे आदेश दिले, ज्यामुळे पवनीकर यांनी उपोषण मागे घेतले.
महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकासाठी २०० कोटी मंजूर !
जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. अधिकृत बार चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. महामार्गावरील ढाबे व हॉटेल्सवर देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. बुटलिंकिंगमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल तोटा होत असल्याचे आरोप वाईन बार असोसिएशनने केले आहेत. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षकांकडे तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर विभागाने बार चालकांवरच विविध प्रकारच्या नियमांच्या नावाखाली कारवाया सुरू केल्या, असा आरोपही करण्यात आला.
बार चालकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवायांमुळे २०-२२ बार चालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या बार चालकांना लक्ष्य करण्याचा आरोप असोसिएशनने केला.
Sudhir Mungantiwar : नाना-नानी पार्क कुटुंबांसाठी आनंद केंद्र बनेल !
आमदार खंडेलवाल यांनी या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाशी चर्चा करून परिस्थिती स्पष्ट केली. आयुक्तांनी यश वाईन बारवरील सील कारवाईला स्थगन देत ते तातडीने उघडण्याचे आदेश दिले. पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आली. या निर्णयामुळे पवनीकर यांचे उपोषण संपुष्टात आले.








