Doctor suicide case : फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात धक्कादायक वळण

Accused Gopal Badne sent to five-day police custody for interrogation : आरोपी गोपाल बदने पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत चौकशी सुरू

Paltan : उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने हादरलेल्या महाराष्ट्रात आता या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. बलात्काराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर शरण आला. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. युवतीच्या सुसाईड नोटमधून समोर आलेल्या आरोपांनंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे.

युवती डॉक्टरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचं आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकरने चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचं नमूद केलं होतं. या पत्रातील मजकूर आणि हातावर लिहिलेली नोट व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर खळबळ उडाली.

Farmer leaders together : नागपुरात उद्या बच्चू कडुंचा महाएल्गार !

या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ हालचाल करत शनिवारी पुण्यातून प्रशांत बनकरला अटक केली होती. मात्र, बदने हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी सातारा पोलिसांनी बीड, पुणे आणि पंढरपूर परिसरात पथके रवाना केली होती. अखेर शनिवारी रात्री उशिरा बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये शरण आला. पोलिसांनी त्याची रात्री दीड वाजेपर्यंत चौकशी केली आणि रविवारी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान गोपाल बदने रडल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याने पोलिसांवर आपला विश्वास असल्याचं सांगितलं. तरीही तपास अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू ठेवली आहे.

Outburst of youth : देशात रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास तरुणांचा उद्रेक अटळ !

दरम्यान, युवतीच्या व्हायरल झालेल्या सुसाईड नोट आणि पत्रांमधून अनेक अभूतपूर्व आरोप समोर आले आहेत. तिच्या जबाबात जवळपास डझनभर पोलिस आणि काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे, तसेच एका खासदार आणि त्यांच्या दोन पीएंचा उल्लेख असल्याचं दिसतं. या पत्रांनुसार युवतीवर नोकरीत छळ होत होता आणि रिपोर्ट बदलून देण्यासाठी राजकीय आणि पोलिसीय दबाव आणला जात होता, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी फलटणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेतला होता. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्र आणि पोलिस यंत्रणेतल्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. स्थानिक लोक, डॉक्टर संघटना आणि महिला संघटनांकडून न्याय आणि सखोल तपासाची मागणी होत आहे.

Rane Vs Rane : आता दोन सख्या भावांचा थेट राजकीय संघर्ष !

या प्रकरणात सध्या दोन्ही आरोपी कोठडीत असून, तपास पोलिसांनी गतीमान केला आहे. मात्र युवतीच्या कुटुंबीयांच्या मते, “केवळ दोन आरोपी नव्हे, तर संपूर्ण यंत्रणा तपासाअंतर्गत आली पाहिजे,” अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रभरातील डॉक्टर आणि विद्यार्थी समुदाय या घटनेविरोधात आक्रोश व्यक्त करत असून, फलटण आत्महत्या प्रकरण आता राज्यातील महिला सुरक्षेच्या आणि प्रशासनातील जबाबदारीच्या प्रश्नाला केंद्रस्थानी आणत आहे.

______