Thackeray ShivSena demands declaration of a wet drought : जिल्हा नियाेजन बैठकीत घुसण्याचा प्रयत्न, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Buldhana सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन व विकास समितीची (डीपीडीसी) बैठक सुरू असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनात खळबळ उडाली.
उद्धव सेनेच्या या धडक आंदोलनामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.
Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली सडकी झाडे
यानंतर पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात पीक नाही, तर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विलंब न करता हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
Demand loan waiver : शेतकरी उद्ध्वस्त; पीएम केअर फंडातून कर्जमाफीची मागणी !
या आंदोलनात जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, छगनदादा मेहेत्रे, वसंतराव भोजने, संदीप दादा शेळके, डी. एस. लहाने, सुमित सरदार, लखन गाडेकर, आशिष रहाटे, गजानन ठोसर, विलास सुरडकर, तुकाराम काळपांडे यांच्यासह तालुका व शहरातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.