Dr. Babasaheb Ambedkar College : ‘त्या’ प्राध्यापिकेचा फक्त विनयभंगच नाही, तर बळजबरीचाही प्रयत्न !

‘That’ professor not only molested but also attempted to coerce : संविधान बचाओ आंदोलन संघटना पिडीतेसोबत ठामपणे उभी

Nagpur : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात उच्च विद्याविभूषीत प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची घटना मागील काळात घडली होती. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला. दरम्यान काल (२२ ऑगस्ट) रोजी संविधान बचाओ आंदोलन या संघटनेचे अध्यक्ष अॅड मिलींद मेश्राम यांनी पिडित प्राध्यापिकेसोबत ताकदीने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्या प्राध्यापिकेचा केवळ विनयभंगच झाला नाही, तर त्यांचा हात पकडून बळजबरीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप अॅड. मेश्राम यांनी केला आहे.

नागपुरात काल आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. मेश्राम म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून या दुर्दैवी व धक्कादायक घटनेच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ते वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकलेल्या आमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांना मोठा मानसीक धक्का बसला आहे. आमचे या महाविद्यालयासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाच्या नावलौकिकाला आम्ही गालबोट लागू देणार नाही. या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी-प्राध्यापक संघटना तसेच आमची संविधान बचाओ आंदोलन संघटना पिडित प्राध्यापिकेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

Bail Pola : बैलांच्या झुलीतून नारा, “सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्या”

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे पावित्र्य व प्रतिमेला धक्का लागू नये, यासाठी आम्ही विद्यार्थी जीवनात कडवा संघर्ष केला. आमच्या काळात (१९९५-९६) प्राध्यापिकाच नव्हे तर विद्यार्थीनींकडेही डोळे वर करून बघण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. मात्र याच महाविद्यालयात एका महिला प्राध्यापिकेसोबत विनयभंगाची घटना घडली. ती धक्कादायक असून त्या विरोधात आम्ही जनक्षोभ पेटवून तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अॅड. मेश्राम यांनी दिला.

Adivasi Pardhi Development Council : लऊळ गावातील पारधी समाजाच्या वन हक्क दाव्यांना मिळाला न्याय !

पिडीत प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून बजाज नगर पोलिसांनी रवी मेंढे व सेवानिवृत्त रोखपाल अरूण जोसेफ यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत तथ्य आढळल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. सद्यस्थितीत जरी आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी येत्या सोमवारी (२५ ऑगस्ट) होणाऱ्या सुनावनीत आरोपींना अटकदेखील होऊ शकते, असेही अॅड. मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अॅड. विवेक इंगळे, नामदेव निकोसे, सुखदेव मेश्राम, नलीनी भगत, प्रेमा खोब्रागडे, बाळासाहेब शंभरकर, प्रशांत बनसोड, लोकेश भूरे, संजय पाटील उपस्थित होते.