Political conflict in Akola over Rangoli: रांगोळीवरून अकोल्यात राजकीय संघर्ष!

Political conflict in Akola over Rangoli : वंचितने मोडली १८ हजार चौरस फुटांची रांगोळी; काँग्रेसने घेतला आक्षेप

Akola भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुने बसस्थानक परिसरात १८ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. ही रांगोळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कलाध्यापक संघटनेच्या वतीने तयार करण्यात आली होती. मात्र, परवानगी न घेता ही रांगोळी काढल्याचा आरोप करत बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही रांगोळी सोमवारी रात्री उशिरा मोडली.

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, ही रांगोळी सार्वजनिक ठिकाणी काढण्यात आली होती. मात्र, त्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात रांगोळी तयार करून तिच्या आजूबाजूची स्वच्छता, शुचिता आणि पवित्रता राखली गेली नाही, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे महामानवांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याची भावना आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली, आणि म्हणूनच त्यांनी ही रांगोळी मोडली.

Amravati Airport : कंपनीने परस्पर केले विमानतळाचे नामकरण!

पातोडे यांनी यावेळी काँग्रेसवर राजकीय उद्देशाने ही रांगोळी केल्याचा आरोपही केला. “काँग्रेसचे पदाधिकारी आणि कलाशिक्षकांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर केवळ प्रचारासाठी करणे हे अशोभनीय आहे,” असे पातोडे म्हणाले.

या प्रकारावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत, “रांगोळी मोडणे ही अत्यंत असंवेदनशील कृती आहे. ती बाबासाहेबांचा अपमानच आहे,” असे म्हटले.

Local Body Elections : अमरावती जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांची आरक्षण सोडत!

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Sapkal अकोला दौऱ्यावर येत आहेत. या प्रकरणावर ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील खबरदारी घेत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.