‘India First’ is essential for the country’s progress : गुवाहाटीत युवा नेतृत्व परिषदेत संघाबद्दलच्या पूर्वग्रहांपासून दूर राहण्याचे आवाहन
Guwahati : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ईशान्य भारतातील तरुणांना उद्देशून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी “भारत प्रथम” या तत्त्वाचे पालन अनिवार्य आहे आणि तरुणांनी संघाबद्दल कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी त्याला प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करावा.
शहरातील बाराबारी येथील सुदर्शनालयात आयोजित युवा नेतृत्व परिषदेत, ईशान्येतील विविध क्षेत्रामधील १०० हून अधिक तरुण प्रतिनिधींसमोर डॉ. भागवत यांनी संघाचे कार्य, विचार आणि राष्ट्रनिष्ठ भूमिका सविस्तर मांडली. ते म्हणाले, “आज संघ व्यापक चर्चेचा विषय आहे, पण चर्चा तथ्यांवर आधारित असावी. प्रायोजित कथा, अफवा किंवा पूर्वग्रहांवर आधारित निष्कर्ष देशाला उपयोगी नाहीत.
MLA Sajid Khan Pathan : डॉक्टर वेळेत येत नाहीत, कर्मचारी उपस्थित नाहीत, रुग्णांचे हाल
डॉ. भागवत यांच्या भाषणादरम्यान त्यांनी ईशान्य भारताबद्दल संघाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, संघाचे उद्दिष्ट संपूर्ण देशात सांस्कृतिक एकात्मतेचे जाळे दृढ करणे आहे. ईशान्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे विविधतेतून ऐक्याची परंपरा आजही जिवंत आहे. या प्रदेशातील तरुणांनी देशाच्या नेतृत्वात अग्रभागी राहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
NMC चे ‘कचऱ्याचे राजकारण’ राष्ट्रवादीचा दणका, मनपा मुख्यालयातच फेकला कचरा !
संघाबाबत सोशल मीडिया आणि विविध राजकीय वर्तुळांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांवर त्यांनी थेट भाष्य केले. ते म्हणाले, संघाबद्दल लिहिले जाते, बोलले जाते, पण ते सारेच तथ्यपूर्ण असतेच असे नाही. म्हणूनच तरुणांनी प्रत्यक्ष संघाचे कार्य पाहावे, विश्लेषण करावे आणि मग मत तयार करावे.
डॉ. भागवत यांनी तरुणांना राष्ट्रहितासाठी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करताना सांगितले, देशाची प्रगती ही सरकार, संघटना किंवा काही व्यक्तींची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाने ‘भारत प्रथम’ या विचाराला मनापासून स्वीकारले, तरच राष्ट्र पुढे जाईल.
Maharashtra politics : अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंचा तक्रारींचा पाढा
परिषदेत उपस्थित तरुणांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी राष्ट्रनिर्माणात शिक्षण, चरित्रघडण आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यातील हा कार्यक्रम विशेष ठरला. ईशान्येतील तरुणांमध्ये संघाच्या भूमिकेबाबत नव्याने उत्सुकता व चर्चा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.








