Dr. Panaj Bhoyar : आदिवासीबहुल गावांचा होणार कायापालट!

Funds approved for the development of tribal villages : १४ कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर; ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना

Wardhaआदिवासीबहुल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या गावाचा विकास करण्यासाठी शासनाने ‘ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा’ योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावांच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे १४ कोटी ५९ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील आदिवासी समाज हा जंगलव्याप्त व दुर्गम भागात वास्तव्यास असल्याने या भागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नव्हता. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दलित वस्ती कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाने आदिवासीबहुल गावांचा विकास करण्यासाठी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. २००४-०५ पासून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

Pratap Sarnaik : एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे !

राज्यातील अकोला, वर्धा, भंडारा, रायगड, जळगाव, नंदूरबार, धुळे, पुणे, नागपूर, अहिल्यानगर, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अमरावती व गोंदिया या जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या मोठी असल्याने ही योजना या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. २०२४-२५ या वर्षासाठी या गावातील पायाभूत सुविधांसाठी ३९० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत आदिवासीबहुल गावातील नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. यामध्ये गाव व परिसरातील रस्ते, सांडपाणी नाल्या, समाजमंदिर, स्मशानभूमी शेड व अन्य नागरी सुविधांची कामे करण्यात येतात. या योजनेमुळे आदिवासीबहुल क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे.

Mangalprabhat Lodha : आता गरिबांच्या जमिनी सुरक्षित राहतील!

वर्धा जिल्ह्यासाठी १४ काेटी ५९ लाख ६९ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून १९५ कामे करण्यात आली आहेत. या कामांपैकी अनेक कामे पूर्णत्वास आली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. यातून आदिवासीबहुल गावांचा कायापालट होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.