Breaking

Dr. Pankaj Bhoyar : आमदार चुकीचा निवडल्याने काम लटकले!

Bus stand work stopped due to wrong MLA being elected : बसस्थानकाच्या कामावरून पालकमंत्री डॉ. भोयर यांची टीका

Wardha भाजप-सेना युतीच्या काळात सन २०१८ ला देवळी बसस्थानकाचे भूमिपूजन केले होते. परंतु त्यानंतर देवळी मतदार संघात चुकीचा आमदार निवडून दिल्याने या बसस्थानकाचे बांधकाम रेंगाळले. वर्धा, सेलू व देवळी बसस्थानकाचे बांधकाम एकाच वेळी मंजूर झाले असतांना देवळीचे बांधकाम वेळेत होऊ शकले नसल्याची खंत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केली. देवळी बसस्थानकाच्या लोकार्पण कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश ईखार, राज्य परिवहन मंडळाचे वर्धा विभाग नियंत्रक प्रताप राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, कार्यकारी अभियंता शीतल गोंड यांच्यासह माजी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, शरद आदमने, नंदू वैद्य, डॉ. श्रावण साखरकर, रवी कारोटकार, शुभांगी कुर्जेकर यांची उपस्थिती होती.

Amravati Congress : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; जिल्हा कार्यकारीणीचा आढावा!

कार्यक्रमात आमदार राजेश बकाने यांनी पुलगाव आगरासाठी दहा नवीन बस मंजूर करण्याची मागणी केली. सोबतच रात्रीच्या वेळी यवतमाळकडे जाणाऱ्या एसटी बस बायपास मार्गे परस्पर जातात. सोबतच बसच्या वेळा नियंत्रित नसल्याचे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना होत असल्याचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात माजी खासदार तडस यांनी एसटी आंदोलनामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडले असल्याचे तसेच आमदार, खासदार झालो असल्याचे सांगितले.

याशिवाय दिसता क्षणी गोळी मारण्याचे आदेश असतांना मागे हटलो नाही. त्यामुळे याचीच पावती म्हणून परिवहन महामंडळाचा राज्यातील एकमेव संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. देवळी बसस्थानकाचे बांधकाम २ कोटी ८९ लाख २४ हजार ३१५ रुपये खर्चातून करण्यात आले आहे. शिवाय याचा भूमिपूजन सोहळा ९ एप्रिल २०१८ रोजी तत्कालीन खासदार रामदास तडस यांचे हस्ते करण्यात आला.

Arvind Sawant : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर!

परंतु महामंडळ प्रशासनाच्या काही चुकामुळे देवळीचे बसस्थानक चर्चेत राहिले आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अधांतरी ठरला आहे. सोबतच बसस्थानकाच्या मागे तसेच दर्शनी भागातील दोन्ही बाजूला अंदाजे सहा हजार चौ.फू. जागा सोडून दिली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या समोरील वाहनतळाची जागा अपूर्ण ठरली आहे. संबंधित बसस्थानकाची प्रशस्त जागा असतांना याला सीमित करण्यात आली आहे. बसस्थानकाचा नामफलक अतिशय लहान तसेच अपूर्ण जागेत असल्याने दुरून दिसत नाही, अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.