Breaking

Dr. Pankaj Bhoyar : प्रदर्शनातून घडावेत भविष्यातील वैज्ञानिक

Future scientists should emerge from the exhibition: बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा समारोप, बक्षीसाची रक्कम वाढणार

Amravati राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधन आणि प्रगतिशीलतेचे दर्शन घडते. या बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट उपक्रमांना दिली जाणारी बक्षीस रक्कम वाढविण्यात येणार आहे. इथल्या कष्टातून भविष्यातील वैज्ञानिक घडावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केली.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित या प्रदर्शनाच्या समारोप झाला. त्यावेळी ते बोलेत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, राज्य विज्ञान परिषदेच्या संचालक डॉ. हर्षलता बुरांडे, राज्य विज्ञान संस्थेचे प्रा. प्रवीण राठोड, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, जयश्री राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष जयंत पाटील पुसदेकर, दिलीप इंगोले, प्राचार्य डॉ. गजानन कोरपे आदी उपस्थित होते.

Akola Bar Association Election : बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. हेमसिंह मोहता!

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, “विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या ठिकाणावरून अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती घडल्या आहेत. संशोधन आणि प्रगतिशीलतेतून नवे शोध समोर येतील. हे शोध समस्या निराकरणासाठी उपयुक्त ठरतील आणि नव्या तंत्रज्ञानाचा विकास करतील.”

ते पुढे म्हणाले, “या प्रदर्शनामधील नव्या संकल्पना बौद्धिकतेला चालना देतील. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे. भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल.”

Dr. Pankaj Bhoyar : पोलीस कुटुंबीयांच्या समस्या मार्गी लावणार

कार्यक्रमात पंकज नागपूरे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. कोरपे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. प्रवीण राठोड यांनी अहवाल वाचन केले. सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रसाद जाधव, युवराज कृष्णकुबेर आणि मनीषा गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सूनयंशी घोंगडे यांना ‘चॅम्पियन ट्रॉफी’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच रेहान दारव्हणकर, जोसेफ, संस्कार देशमुख, पुष्पा वाकचौरे, पुनम कावर, गायत्री धुरी, संतोष देशमाने आणि गणेश बदकल यांना प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.