No-salary-to-school-id-scam-teachers-pankaj-bhoyar : मृत व सेवानिवृत्त शिक्षकांची आयडी वापरून केली होती भरती
Nagpur नागपूर विभागात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. मृत व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची आयडी वापरून नव्या शिक्षकांची भरती करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. जुन्या तारखेत वेतनाची उचल करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक अधिकारी, शिक्षक आणि शाळा संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घोटाळ्यातील सर्व शिक्षकांचे वेतन तुर्तास रोखून धरण्यात आले आहे.
चार आठवड्याच्या आता संबंधित शिक्षकांच्या वेतनावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत शिक्षकांच्या वेतनाबाबत खुलासा करण्याची मागणी सरकारकडे केली. अभिजित वंजारी यांनी सभागृहात सांगितले की, नागपूर विभागात शालार्थ आयडी संदर्भात मोठा घोटाळा समोर आला असून या प्रकरणात ८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Iran war update : फडणवीसांनी चक्र फिरवले, अभिनेत्रीचा मुलगा कुवैतमधून सुखरुप भारतात
शासनाने दिलेल्या उत्तरात हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्याचे म्हटले आहे. मात्र उच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे, तसेच त्या आदेशात संबंधित ६३२ शिक्षकांचे वेतन थांबवण्याबाबत काही निर्देश देण्यात आले आहेत का, याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, असा थेट प्रश्न वंजारी यांनी शिक्षण राज्यमंत्र्यांना केला.
Iran war update : युद्ध इराणमध्ये, फटका मुंबई-पुण्याला; ८० हॉटेल्स बंद होण्याची भीती
यावर उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, या प्रकरणातील काही शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते आणि उच्च न्यायालयाने त्यांना वेतन देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या आदेशाविरोधात शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नुकताच प्राप्त झाला असून या प्रकरणात चार आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती राज्यमंत्री भोयर यांनी सभागृहात दिली.








