Rs 11.3 crore approved for development of pilgrimage sites in Wardha : विकासकामांसाठी ११ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर
Wardha जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व विषद करणारी अनेक स्थळे अस्तित्वात आहेत. पण त्याचवेळी मोठा धार्मिक वारसाही लाभला आहे. जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांचा ‘क’ वर्ग तीर्थस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीर्थस्थळांच्या विकासासाठी ११ कोटी ३० लाखा रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ४० तीर्थस्थळांचा कायापालट होणार आहे.
जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे अनेकांची श्रद्धास्थाने आहे. दररोज शेकडो भक्त या स्थळांना भेट देतात. मात्र, सुविधांची कमतरता असल्याने भक्तांना अनके अडचणी येत होत्या. त्या लक्षात घेऊन या तीर्थस्थळांचा ‘क’ वर्ग तीर्थस्थळामध्ये समावेश करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
Nitin Gadkari : सरकारी अधिकाऱ्यांना आदिवासी भागात किमान पाच वर्षे नोकरीची सक्ती हवी
या तीर्थस्थळांचा विकास झाल्यामुळे या गावातील अथवा परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. मंजूर निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मंदिराचा विकास, जीर्णोद्धार, भक्त निवासाची उभारणी, रस्ते, पोहोच मार्गाची सुधारणा, पिण्याच्या पाण्याची सोय, सभागृह बांधकाम, शौचालय आणि स्नानगृहे, सौंदरीकरण, विद्युतीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प इत्यादींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सालोड (हिरापूर) येथील संत सदानंद महाराज देवस्थान, शंकर देवस्थान उमरी (मेघे), श्री संत गजानन महाराज मंदिर म्हसाळा, संत अवचित महाराज देवस्थान पिपरी (मेघे), श्री साई बाबा देवस्थान आंजी (मोठी), श्रीकृष्ण देवस्थान आमला, नरसामाता देवस्थान आंजी (मोठी), संत मानखोदी देवस्थान गोजी आदी देवस्थानांचा यामध्ये समावेश आहे.
Nitin Gadkari : गडकरींनी शब्द पाळला; अकोल्यासाठी २७.५ कोटींचा निधी मंजूर
तीर्थस्थळांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. तीर्थस्थळांच्या सुविधा यापुढेदेखील वाढविण्यात येतील. तीर्थस्थळामुळे गावाचे महत्त्व वाढणार असून, स्थानिक विकासासोबतच अर्थकारणालादेखील बळकटी मिळणार आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.