Co-operative sector will get past glory : राज्यमंत्र्यांना विश्वास; जिल्हा बँकेच्या ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न
Wardha जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आर्थिक बळकट करणारी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने सहकारातून समृद्धी निर्माण करणे. सहकाराला बळकट करण्यासाठी सहकार विभाग, राज्य सहकारी बँक मुंबई व वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मेळाव्याचे आयोजन दत्ता मेघे सभागृह सावंगी येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
Advantage Vidarbha 2025 : उद्योग विकासासाठी सरकारचा ‘मैत्री’चा हात
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर होते. आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., अपर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील, व्यवस्थापकीय संचालक राज्य सहकारी बँक दिलीप दिघे, सहकार विभागाचे माजी अप्पर आयुक्त एस.बी. पाटील, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, राज्य सहकारी बँकेचे अशोक माने, प्रगतीशील शेतकरी प्रशांत इंगळे, विवेक जुगादे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आर्थिक संकटात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य शासनाने 163 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. रिझर्व बँकेने सुध्दा परवाना दिला आहे. त्यामुळे आता बँकेने सक्षमीकरण करण्याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सावकरांकडून कर्ज घेण्याचा कल कमी करावा.
Maharashtra Government : समृद्धी महामार्गावर एकाच रात्री तीन अपघात!
अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकेने प्रयत्न करावे. केंद्र शासनाने सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यातील 12 हजार सेवा सहकारी संस्थांचे लवकरच संगणकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थाचा सुध्दा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भोयर म्हणाले.








