Deadline for Filing Objections Extended Until 14th October : नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषदेच्या गट-गणांची निवडणूक प्रक्रिया वेगाने पुढे
Akola जिल्हा परिषदेच्या गण-गटांसह नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली. या यादीवर १४ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. तसेच, नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी काढण्यात आली असून, त्यावरही गुरुवारपासून आक्षेप दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना आणि त्यानंतर नगराध्यक्ष व सदस्यपदांचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’
दरम्यान, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोमवार, १३ ऑक्टोबरला जाहीर केले जाणार आहे.
मतदार यादीसंबंधी कार्यक्रमपत्रिका
निवडणूक विभागाने १ जुलै २०२५ या अर्हता दिनांकावर अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या वापरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या तयार केल्या आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आक्षेप दाखल करण्याची मुदत : ८ ते १४ ऑक्टोबर
अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित होण्याची तारीख : २७ ऑक्टोबर
नगर परिषद व नगरपंचायतींसाठी आक्षेप नोंदविण्याची मुदत : ८ ते १३ ऑक्टोबर
अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होण्याची तारीख : २८ ऑक्टोबर
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष : ठाकरे गटाचा ‘हंबरडा’!
उद्या पंचायत समिती सभापती आरक्षणाची सोडत
जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापतिपदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणार आहे. या सोडतीत विविध प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यानुसार—
अनुसूचित जाती : २ पैकी १ महिला
अनुसूचित जमाती : १ महिला
नागरिकांचा मागासवर्ग : २ पैकी १ महिला
सर्वसाधारण प्रवर्ग : २ पैकी १ महिला