व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात

कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात

हेक्टरी १ लाख देण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी या निर्णयाने विरोधकांचे अजिबात समाधान झालेले नाही. केवळ कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही; सध्याची विदारक परिस्थिती पाहता शेतकऱ्याला तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्या, अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून विरोधक दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करत होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शनिवारी दुष्काळ जाहीर केला. मात्र, यानंतर सरकारने जारी केलेला जीआर म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

बल्लारपूर, ब्रह्मपुरी व जिवतीच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. समृद्धी महामार्गाच्या आसपास पाहणी करून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्वतः सरकारनेही मान्य केले. मात्र प्रत्यक्ष मदतीची वेळ आली तेव्हा जुन्याच तरतुदींची पुनरावृत्ती करून शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हातातले पीक करपून गेले आहे, खिशात दमडी उरलेली नाही आणि पुढचे अख्खे वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा वेळी हेक्टरी १ लाख रुपयांच्या ठोस मदतीची अपेक्षा होती. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सरसकट मदतीचे आश्वासन दिले होते, मग आता पंचनाम्यांसाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त कशासाठी? तोपर्यंत बळीराजाने जगायचे कसे? शेतकरी होरपळत असताना सरकार मात्र कागदी कारवाईत वेळ घालवत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

error: Content is protected !!