Highlights of Eknath Shinde’s speech at Dussehra gathering : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणातील ठळक मुद्दे
Mumbai : गोरेगाव नेस्को मैदानावरील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या कामगिरीचं कौतुक करत महायुतीच्या विजयाचा नारा दिला.
शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, हा एकनाथ शिंदेंचा शब्द. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेणार.
“रंग बदलणारा असा सरडा मी पाहिला नाही,” असा अप्रत्यक्ष हल्ला. उद्धव ठाकरेंवर करत त्यांनी सांगितले की “हे लेना बँक नाही, देना बँक आहे,”म्हणत त्यांनी मदतीबाबत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
Thackeray brand : राज आणि मी एकत्र राहण्यासाठीच एक झालो आहोत !
30 वर्षे पालिका लुबाडली, माया कुठे गेली? लंडनला?” असा थेट आरोप. “माझी संपत्ती म्हणजे शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार, प्रॉपर्टी नव्हे,” असं स्पष्ट केलं. “राम मंदिर कोणी बांधलं, 370 कोणी काढलं? हे सर्व मोदींनी केलं. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही,” असं म्हणत शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं.
संघाच्या 100 वर्षांबद्दल शुभेच्छा देत टीका करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महायुतीचा विजयाचा नारा येताना शिंदे म्हणाले “लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. अन्यथा मुंबई 25 वर्षे मागे राहील.”
शिंदेंनी ठाकरे-मनसे युतीवर टोला केली “कोण कोणाशी युती करतं याची चिंता करू नका, त्या सगळ्यांचा हिशोब आमच्याकडे आहे,” असं सूचक विधान केल.
मोदींच्या पाकिस्तान धोरणाचं कौतुक करताना शिंदे म्हणाले “पहलगाममध्ये पाकड्यांनी बहिणींचं कुंकू पुसलं, त्याला मोदींनी योग्य उत्तर दिलं ‘ गोली का जवाब गोली से’. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी – “पुढचं वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. ते भव्यदिव्य पद्धतीने साजरं करू,” अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.
शिंदे यांच्या या भाषणात शेतकऱ्यांना दिलासा, उद्धव ठाकरेंवर हल्ला आणि मोदींचं कौतुक या तिन्ही गोष्टी ठळकपणे दिसून आल्या.