व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी दिले ‘ईरई’च्या सर्वेक्षणाचे निर्देश !

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी दिले ‘ईरई’च्या सर्वेक्षणाचे निर्देश !

On Mungantiwar’s Request, CM Orders Survey of ‘Erai River : पुरामुळे धोकादायक ठरत आहे ईरई नदी

Chandrapur : ‘नेमेची येतो पावसाळा..’ या उक्तीप्रमाणे चंद्रपुरातील ईरई नदीचे झाले आहे. या नदीला दरवर्षी पूर येतो आणि काठावरील व आसपासच्या परिसरातील अनेक घरे बाधित होतात. यामध्ये दरवर्षी मोठे नुकसान होते. कारण या नदीची पूररेषा चुकीची निर्धारित करण्यात आली आहे. नेमकी ही बाब राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली आणि पूररेषा नव्याने सर्वेक्षण करून निश्चित करण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नव्याने पूररेषा निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

चंद्रपूर शहरातून वाहणारी ईरई नदी दरवर्षीच धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. २०१३ साली अनेक घरे बाधित झाली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने २०१४मध्ये सर्वेक्षण करून आयआयटी मुंबईमार्फत २०१६ मध्ये अहवाल सादर केला होता. या अहवालास २०१७ मध्ये मान्यता देण्यात आली. पण त्या सर्वेक्षणातील काटछेद ५०० मीटर अंतरावर घेतल्यामुळे अनेक घरे व अकृषक भुखंड चुकीने ब्यू झोनमध्ये आले. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Prajakata Mali : ..अन् म्हणूनच सुधीरभाऊंना विकासपुरूष म्हटले जाते !

डायरेक्टर जनरल मेरी, नाशीक यांच्या १६ नोव्हेंबर २०१५ च्या परिपत्रकानुसार घनदाट लोकवस्तीच्या भागात काटछेदाचे अंतर १०० मीटर असणे बंधनकारक आहे. त्याकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्याने ही पूररेषा निश्चिती चुकीची ठरली आहे. या समस्येकडे आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नुकत्याच मुल विश्रामगृहावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने नव्याने सर्वेक्षण करून पूररेषा निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आर्थिक नुकसानापासून बचावासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!