Pankaja Mundes impressive speech at Dussehra gathering : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं प्रभावी भाषण
Beed : २ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका, कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे धंदे करू नका” असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात जनतेला करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘चांगल्या माणसाचं चांगलंच होतं, भगवान बाबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतात. मला तुमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. हा मेळावा फक्त सोहळा नाही, तर संघर्षाने उभ्या राहिलेल्या साध्या भोळ्या फाटक्या माणसांचा कार्यक्रम आहे.”
पूरग्रस्त परिस्थितीची आठवण करून देताना त्यांनी सांगितलं की, “पूर आला, घरे वाहून गेली तरी लोक या मेळाव्यात आले. सोन्यासारखी माणसं इथं सोनं लुटण्यासाठी जमली आहेत. प्रत्येक माणूस हे सोन्याचं नाणं आहे.”
Jarange emotional : ‘ मी थोड्या दिवसांचा पाहुणा…’ डोळ्यात तरळले अश्रू
जातीवाद आणि धर्मवादावर प्रहार
पंकजा मुंडे म्हणाल्या “आजच्या कलयुगात रक्तबीजासारखे राक्षस जन्माला आलेत. चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या धोरणातून जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस उभे राहतात. जातीपातीच्या भिंती निर्माण झाल्यात, त्या दूर करण्यासाठी आईने आम्हाला शक्ती द्यावी.”
त्यांनी पूरकाळातील ऐक्याचं कौतुक करत “संकटाच्या वेळी जातपात न पाहता लोक मदतीला धावले. भविष्यात जाती-जाती एकत्र आणण्याचा धागा आपल्यालाच बनवायचा आहे” असं आवाहन केलं.
Prajakata Mali : ..अन् म्हणूनच सुधीरभाऊंना विकासपुरूष म्हटले जाते !
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करताना पंकजा मुंडे म्हणाल्या “गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नव्हता. त्यांनी त्याला समर्थन दिलं होतं. आम्हीही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. मात्र, आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका हीच विनंती आहे.”
बीडच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी दिलेला हा संदेश जातीय ऐक्य, स्वाभिमान आणि आरक्षणाच्या न्याय्य लढ्याला नवी दिशा देणारा ठरल्याचं बोललं जात आहे.
___








