Eknath Khadse : भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना न्यायालयाचा दणका; अजामीनपात्र वॉरंट जारी

bhosari-midc-land-case-court-issues-warrant-legal-trouble : पुणे एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी सुनावणीला अनुपस्थिती भोवली; प्रकृतीचे कारण देत खडसेंनी मौन पाळले

Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील बहुचर्चित भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणात वारंवार सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने खडसे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेने वेग घेतल्यामुळे खडसे कुटुंबीयांभोवतीचा कायदेशीर फास अधिक घट्ट होत असून, ऐन राजकीय घडामोडींच्या काळात या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भोसरी येथील एमआयडीसीच्या जमिनीचा व्यवहार हा एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठा वाद ठरला आहे. महसूलमंत्री असताना पदाचा गैरवापर करून ही जमीन नातेवाईकांच्या नावे खरेदी केल्याचा प्राथमिक आरोप त्यांच्यावर आहे. शासकीय जमिनीचा खासगी फायद्यासाठी वापर केल्याचा दावा तपास यंत्रणांनी न्यायालयात केला असून, या प्रकरणाचा तपास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

ZP election : लोकशाहीची थट्टा! मतदान केंद्रात आमदाराच्या अल्पवयीन मुलाकडून मतदान; बोटाला शाई लावल्याने संताप

काल झालेल्या सुनावणीला खडसे उपस्थित राहू शकले नाहीत. यापूर्वीही अनेकदा गैरहजेरी राहिल्याने न्यायालयाने यावेळी कडक भूमिका घेतली. सुनावणीला दांडी मारल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्याचे आदेश दिले. “माझी प्रकृती ठीक नसल्याने मी हजर राहू शकलो नाही,” असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Wardha to Nagpur OBC census campaign : वर्धा ते नागपूर ‘ओबीसी जनगणना अभियान’ पेटणार; जनगणनेत स्वतंत्र कॉलमसाठी मुक्ती मोर्चाचा एल्गार

एकेकाळी भाजपचे सर्वात प्रभावी नेते असलेले खडसे याच प्रकरणामुळे मंत्रिपदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीची वाट धरली. आपल्यावरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा दावा खडसे सातत्याने करत आले आहेत. या न्यायालयीन प्रक्रियेचा अंतिम निकाल खडसे यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकारला आणि खडसेंना घेरण्यास सुरुवात केली आहे.