Eknath Shinde Cash Bag : एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात ‘पैशांच्या बॅगा’ प्प्रकरणाने खळबळ

Former Thackeray MLA makes serious allegations against Shinde group : शिंदे गटावर ठाकरे गटाच्या माजी आमदाराचे गंभीर आरोप

Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर समोर आलेल्या नव्या व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदेंच्या मागून बॉडीगार्ड या बॅगा कॅमेऱ्यापासून लपवत नेताना दिसत असून यातीलच पैसा नंतर मतदारांना वाटण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या धोरणांवर सडकून टीका करत मालवणच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्याच्या सत्तेत राहून जनतेच्या पैशातून भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा निवडणूक जिंकण्यासाठी वापरला जात आहे. “पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा” हेच धोरण शिंदे-शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणाने मालवणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Nagar Parishad Elections 2025 : राज्यभर मतदानाला ठिकठिकाणी ब्रेक !

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार निलेश राणे यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत २५ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा राणेंनी केला होता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही थेट निशाणा साधला होता. मात्र आता वैभव नाईक यांनी उलट निलेश राणेंवरच पैसे वाटपाचा आरोप करत लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे एकीकडे भाजप आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच आता शिंदे गटाकडूनही पैशांचे वाटप झाल्याचा दावा पुढे आल्याने मालवणमधील निवडणूक सामना अधिकच तीव्र होत आहे.

Municipal elections 2025 : मतदानादरम्यान शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

निवडणुकीच्या मैदानात आरोप आणि प्रत्यारोपांची धग पेटली असतानाच स्थानिक मतदारांमध्येही चर्चा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर झाला की नाही, याबद्दल तपासाची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मतदानाचा दिवस जवळ आल्याने सुरक्षा आणि निवडणूक यंत्रणेसमोर कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान अधिक वाढले आहे. मालवणच्या राजकारणातील पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे.