Resolved to work to bring happiness to the faces of the people : जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी काम करण्याचा केला संकल्प
Thane Mumbai : स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. यासोबतच त्यांचे कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेम्भी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिघे साहेबांच्या स्मृतींना वंदन केले. तसेच आनंद आश्रमासमोरील चौकात असलेल्या त्यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यापुढेही नतमस्तक झाले.
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुती सरकारला निर्विवाद कौल दिला. जनतेने पुन्हा सत्तास्थानी बसवले आहे. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठींब्याने हे सरकार निवडून आले.
Fault in E-tendering : बाजार समितीमध्ये ४४ लाखांचा गैरव्यवहार!
आता दिघे साहेबांचा शिकवणीनुसार लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून लोकांसाठी काम करून त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आनंद आणण्यासाठी काम करण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.