Shiv Sena spokesperson Kiran Sonawane’s venomous criticism of Uddhav Thackeray : शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांची उबाठावर जहरी टीका
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने ६० आमदार आणि ७+१ खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आपला निर्विवाद नेता मानले आहे. पण ज्यांचा बाजार विधानसभा निवडणुकीत जनतेने उठवला, अशा काँग्रेस, उबाठाची वकिली करणाऱ्या मानेच्या किरणला एवढंच सांगायचं आहे की, लोकनेते एकनाथ शिंदे हे कुणाच्या उसन्या खांद्यावर किंवा बापजाद्याच्या जीवावर झालेले नेते नाहीत, असे शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले.
कुणाल कामराच्या प्रकरणाबाबत बोलताना सोनावणे म्हणाले, एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार अंगिकारून, स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कोट्यवधी लोकांच्या आशीर्वादाने नेते झाले आहेत, हे काँग्रेसी उबाठाचे फिल्टर लावून बघणाऱ्या नाटक्याला नाही समजणार. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व स्वतः शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने जाहीरपणे मान्य केले आहे.
DCM Eknath Shinde : शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष, काम करेल तोच पुढे जाईल!
लवकरच “दूध का दूध पानी का पानीं” होईल. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना कुणाचेही चारित्र्यहनन करण्याचे लायसन्स देत नाही. कुणाल कामरा या विदुषकाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुपारी घेऊन केलेल्या थुकरट स्टॅन्ड डाउन कॉमेडीला उबाठा-काँग्रेस-लालभाई आजकाल चघळत बसले आहे. यांचे 10/12 लोकं आहेत ते असा काही विषय आला की, त्यांना ज्यादाची बुद्धी फुटते आणि ते वाट्टेल ते अकलेचे तारे तोडत असतात, असे म्हणत सोनावणे यांनी उबाठावर तोफ डागली.
Eknath Shinde : मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे समोर आले !
काही सिरीयल आणि सिनेमे केलेल्या “नटा”ची यात भर पडली आहे, त्याच नावं किरण असले तरी त्याची किरकिर किरणे ही सारखी लालभाई आणि काँग्रेसच्या फिल्टरमधून बाहेर पडत असतात. कुणाल कामरा हा पोलिसांनी समन्स देताच सरळ झाला असून मुंबई पोलिसांत हजर होण्यासाठी येतो आहे. तो आल्यावर त्याला न्यायालयाला सामोरे जाऊन काय निर्णय व्हायचा तो होईल; पण या अभिनेत्याला असे विचारायचे आहे की, कुणाल कामराच्या वेळी उफाळून आलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उर्मी मराठमोळ्या केतकी चितळे च्या वेळी कुठे गेली होती, असा सवालही सोनावणे यांनी केला.