Breaking

Eknath Shinde Shivsena : शिवसेनेच्या पारंपरिक जागांवर शिंदे गटाचा दावा

Shinde group claims traditional seats of Shiv Sena : जिल्ह्यात समिती स्थापनेचा आग्रह, ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न

Akola सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) १३ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिंदे गट या पारंपरिक जागांसह २५ पेक्षा जास्त जागांवर दावा करणार असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारांची निवड ठरवण्यासाठी जिल्ह्यात प्रमुख नेत्यांची समिती स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

जि.प. निवडणुका २०२० मध्ये झाल्यानंतर जानेवारी २०२५ पूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आवश्यक होती. मात्र, ओबीसी आरक्षणावरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुका होऊ शकल्या नाहीत. निवडणूक आयोगाने प्रशासक नेमण्याची शिफारस केल्यानंतर १७ जानेवारीपासून प्रशासक राज सुरू झाले. आता ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Agricultural irrigation : पहिला हायटेक बलून बंधारा आता बाघ नदीवर

राजकीय विश्लेषकांच्या मते, यंदा जि.प. सदस्यसंख्या ५२ वरून ६० होण्याची शक्यता असून, त्यामुळेच शिंदे गट महायुतीमध्ये अधिक जागा मागणार आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आल्यानं, याच पार्श्वभूमीवर जि.प. निवडणुकीतही त्यांनी ठाकरे गटाच्या पारंपरिक जागांवर दावा केला आहे.

दरम्यान, मुंबईतील बैठकीत जिल्ह्यातील अंतर्गत वाद समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावेळी काही नेत्यांनी थेट संभाव्य उमेदवारांची यादीच सादर केली. माजी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी स्थानिक राजकीय स्थिती मांडत, ग्रामीण भागातील जाण असलेल्या नेत्यांची समिती स्थापनेची गरज अधोरेखित केली.

Mahayuti Government : निपुण कृतीचा फज्जा! विद्यार्थी उपाशी, शिक्षकही थकले!

शिंदे गट निवडणुकीत प्रभावी सहभागासाठी आग्रही आहे. मात्र, महायुतीमधील भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या सभापती निवडणुकीत भाजपने वंचितला पाठिंबा दिला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.