Shiv Sena’s marathon meetings in Akola : अकोल्यात शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र, आघाड्यांचा आढावा
Akola राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी राज्यभरात शिवसेना सक्रिय झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांच्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे. नुकताच अमरावती येथे अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांचा संयुक्त आढावा घेण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे. शिवसेनेचे माजी आमदार आणि अकोल्याचे निरीक्षक शशिकांत खेडेकर हे १९ आणि २० ऑगस्ट रोजी अकोल्यात तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या समवेत जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत.
Pawars warning : पक्षाच्या नावावर दुकानदारी केली तर त्याचा बंदोबस्त करणार,
गेल्या दोन दिवसांपासून युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना, कामगार आघाडी, शिक्षक आघाडी, अनुसूचित जाती विभाग, सर्व तालुकाप्रमुख आणि विभागप्रमुख यांच्यासोबत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. बैठकीत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला जात असून, जिल्ह्यातील समस्या व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
Farmers morcha : माझ्या नादाला लागला तर ‘तिथं’ नांगराचा फाळ घालीन
आढावा बैठकीत गेल्या काही वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करून, सक्षम व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अकोला शहर आणि ग्रामीण भागात शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी पक्ष विशेष मोहीम राबवणार असल्याचे निरीक्षक खेडेकर यांनी सांगितले.








