Breaking

Eknath Shinde : हिमाचल आणि जम्मू-काश्मीरचा उबाठाला जय महाराष्ट्र !

There were also landslides in Niphad, Dindori and Nagpur in Nashik to Shiv Sena : नाशिकमधील निफाड, दिंडोरी आणि नागपुरातही पडले भगदाड

Shiv Sena News : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बीड, नाशिक, परभणी, कल्याण, सायन, मुलुंड येथील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ( १८ जानेवारी) शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने उबाठा गटाला मोठे भगदाड पडले. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक बळकट झाली आहे.

उबाठा गटाचे हिमाचल प्रदेशचे राज्य प्रमुख आणि जम्मू आणि काश्मिरच्या उप राज्य प्रमुखांनीही शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यासोबतच माजी काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र आणि उबाठा गटाचे माजी विधान परिषद आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नागपूरसह विदर्भात शिवसेनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister: थेट मुख्यमंत्र्यांचे सहकारी; जयस्वाल यांना बंपर लॉटरी!

हिमाचल प्रदेशचे उबाठाचे राज्य प्रमुख नरेश कुमार संजू, हिमाचल प्रदेशचे युवासेना प्रभारी दिशाल संजू तसेच जम्मू काश्मिरचे उपराज्य प्रमुख महेंद्र पाल शर्मा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.

मागील महिनाभरात राज्याच्या विविध जिल्ह्यांतील उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शनिवारी (१८ जानेवारी) निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील उबाठा गटाच्या २०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे शिंदे यांनी सांगितले. यात दिंडोरी तालुक्यातील ३६ पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

प्रामुख्याने प्रवीण जाधव, नाना मोरे, रघुनाथ आहेर, अरुण कड, कैलास पगारे अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. निफाड तालुक्यातील २१ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात राजेश पाटील, निलेश पाटील, सुधीर कराड, किरण लभडे, सुजित मोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Mahayuti Government : निवडणूक झाली, सरकार आले, पण कर्जमाफीचे काय झाले ?

कल्याणमधील एमआयएमचे माजी नगरसेवक तांझिला आयाज मौलवी आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आयाझ गुलजार मौलवी, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष शारजिल अन्सारी, कल्याण डोंबिवलीचे अल्पसंख्याक विभागाचे विधानसभा प्रमुख शाहिद खान, शेख मोहम्मद अन्सारी आणि त्यांचे सहकारी तसेच महेश सोनावणे, अमोल चव्हाण, सुनील सावने, प्रशांत मथुरे आशा इतर पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

याचप्रमाणे सायन मुंबईतील समाजसेवक नित्यानंद यादव व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माज़ी आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, अंबरनाथचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके, उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, राजू लवटे, नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि नाशिकमधील शिवसेना आणि युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.