Breaking

Eknath Shinde : ‘स्वामित्व’ सरकारी योजना नव्हे, तर ग्रामविकासाची चळवळ !

Village land survey certificate distribution program in Thane district : ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम

Thane News : खेड्यापाड्यांतील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु आहेत. त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावर कब्जा केला जातो. कोर्ट कचेऱ्यांमध्ये हेलपाटे मारताना पिढ्यान् पिढ्या खर्ची पडतात. असे होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजना आणली आहे. ही फक्त एक सरकारी योजना नाही तर ग्रामविकासाची चळवळ आहे. असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झाला. यानुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. त्यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

Nitin Gadkari : नागपुरात सुरू होणार इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, विकास गजरे, मल्लिकार्जून माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, भूमी अभिलेख कार्यालयाचे इतर अधिकारी-कर्मचारी आणि स्वामित्व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावांतील आबादी क्षेत्रातील घरांसाठी सनद व मालमत्ता पत्रक देणे, हा आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा दावा, आम्ही महायुती म्हणूनच लढणार !

स्वामित्व योजनेचे लाभ सर्वात महत्वाच्या व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिनस्त असलेले तालुका ठाणे, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ मधील एकूण 43 गावांत स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाचे कार्यक्रम संबधित गावांमध्येही आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वामित्व योजनेच्या या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित आहोत. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरणही करण्यात आले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सुखाचे आणि चिंतामुक्त दिवस आले आहेत.

भारताचा आत्मा गावांत आहे, असे आपण नेहमी म्हणतो. परंतू, दुर्देवाने ग्रामीण भाग काहीसा दुर्लक्षित राहतो. परंतु, 2014 नंतर परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागाची ‘आर्थिक प्रगती’ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात असंख्य लोकाभिमुख योजना आणल्या. 2020 मध्ये सुरू केलेली “स्वामित्व योजना” ही त्यांपैकीच एक अत्यंत यशस्वी योजना आहे. ही योजना म्हणजे ग्रामस्वराज्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे. ग्रामीण भागातील गरिबांना आत्मनिर्भर करणारी मोहीम आहे. हे केवळ मालमत्तेचे कार्ड नाही तर त्यांचे “स्वाभिमान कार्ड” आहे. “माझी संपत्ती माझा अधिकार” असे सांगणारे हे कार्ड असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.