Election Commission of India’s answer to allegations on voter list and process : निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही
Mumbai : २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लोकसभा निवडणुकीच्या अगदी विपरीत लागले. त्यानंतर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगावर विविध आरोप केले गेले. त्या सर्व आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही, तर कायद्यांनुसारच निवडणुका पार पडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांच्या उपस्थितीतच मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदानानंतर काँग्रेसच्या उमेदवारांकडून अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे किंवा निरीक्षकांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. १९५० च्या लोकप्रतिनिधी अधिनियम व १९६० च्या मतदार नोंदणी नियमांनुसार मतदार यादी तयार केली जाते. दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. अंतिम यादी सर्व राजकीय पक्षांना दिली जाते, असे आयोगाने म्हटले आहे.
Terrorist attack in Kashmir : उरी, पठाणकोट, पुलवामा अन् आता पहलगाम.. इंटलिजन्स करतेय तरी काय ?
अतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ९० अपील आले होते. हे मतदारांच्या संख्येच्या तुलनेत फारच कमी आहेत आणि विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही मोठी तक्रार नोंदवली गेली नाही. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ६ कोटी ४० लाख ८७ हजार ५८८ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत दर तासाला सरासरी ५८ लाख मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत ११६ लाखांच्या तुलनेत केवळ ६५ लाख मतदारांनी मतदान केले. यावरून कोणताही गैरप्रकार झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही, असेही आयोगाने स्प्ष्ट केले आहे.